त्यामुळे जिवाणू मरतात का? आणि वापरावयाचे असल्यास कोणते वापरावे? "
मी यातील तज्ञ नाही पण 1995 पासून आज पर्यन्त दर वर्षीच्या नविन ऊस लागणीत, आवश्यकतेनुसार तणनाशकाचा उपयोग करीत आलो आहे. त्या पासून मला योग्य फ़ायदा झाला आहे.
तणनाशकाचे दोन प्रकार आहेत.
1. तण उगवल्या नंतर वापरायचे
2. तण उगवणीपूर्वी वापरावयाचे
1 तण उगवल्या नंतर वापरायचे
जमिनीत पिक नसताना आणि तण भरपूर असेल तर "ग्लायफोसेट" घटक असणारे तणनाशक फवारावे. त्याचे प्रमाण त्यावर लिहिल्या प्रमाणे घ्यावे. हे तणनाशक हिरव्या पानावर फवारल्या नंतर पानातुन आत शोषले जाते आणि ते मुळ्या पर्यन्त पोहोचते. मुळ्याची तोंडे खराब होतात. त्यामुळे तणाला जमिनितुन काही शोषून घेता येत नाही आणि तण मरुन जाते. या तणनाशकाचे वैशिष्ट म्हणजे
~ हे तणनाशक मातीच्या संपर्कात आल्यास निष्क्रिय होते. त्या मुळे मातीवर फारसा वाईट परिणाम होत नाही.
ब-याच वेळा योग्य प्रमाणात तणनाशक फवारून आपणास अपेक्षित परिणाम दिसत नाही. मग आपण कंपनीस नावे ठेवतो.
असे तणनाशक फवाराताना पाणी फार स्वच्छ घ्यावे. पाण्यात थोडे जरी मातीचे कण असतील तर त्या मातीच्या कणाशी सम्पर्क होऊन तणनाशक निष्क्रिय होऊ शकते किंवा त्याची क्षमता कमी होते. त्या मुळे फ़वारणि साठी घ्यावयाचे पाणी स्वच्छ असावे. बर्याच वेळा पाटातिल पाणी, नदीचे पाणी फवारणी साठी घेतले जाते त्यात मातीचे प्रमाण असते, आणि त्या मुळे योग्य रिझल्ट मिळत नाहित. शक्यतो आदल्या दिवशी पाणी साठवलेले फवारणिस घ्यावे. यामध्ये अमोनियम सल्फेट किंवा यूरिया प्रति लिटर पाण्यास 3 ग्राम प्रमाणे मिसळावे.
काही वेळा ऊस दोन तीन महिन्याचा होतो , पाऊस आणि वेळेवर मजूर न मिळाल्या मुळे तण काढायचे राहून जाते. ऊस आणि तण बरोबरच वाढतात. अशा वेळी 2 4 D घटक फवारल्यास बरेचसे तण मरते. ऊसावर वाईट परिणाम होत नाही. यासाठी बाजारात बरीचशी तणनाशक उपलब्ध आहेत. दुकानदाराशी आणि कंपनीच्या प्रतिनिधिशी चर्चा करुन योग्य तणनाशक निवडावे.
ऊसाच्या पानावर न पड़ता फक्त तणावर, हुड लावून ग्लायफोसेट फवारले तर उसास काहीही वाईट परिणाम न होता तण मरेल.
# लक्ष्यात असू दया.
# ऊस तुटुन गेल्यानंतर फड पेटवला असता त्याच्या उष्णतेने जमिनीतील 1 ते 2 इंचातील जीवाणु मरतात.
# तणनाशकामुळे असे नुकसान होत नाही. अगदी वरच्या थरातील जीवाणु काही प्रमाणात मरतात.
# "अति तेथे माती " हे ही लक्ष्यात असू दया. सारखे सारखे तणनाशक फवारु नये. त्या मुळे जमीनीवर वाईट परिणाम होत असतो.
# शिफारशी प्रमाणेच फवारावे.
# ग्लायफ़ोसेट हिरव्या पानावर पडले की ते पिक मरते.
माझेकड़े ऊस पिकास लावणी नंतर एकदा तण नाशकाची फ़वारणी होते. ऊस तुटल्यानंतर पाचटचे आच्छादन असल्याने तण उगवत नाही. वरम्ब्यावर थोडेफार येते, तेवढे काढणे फार अवघड नसते. खोडवा आणि निडवा या वेळी पाचट आच्छादनामुळे तणनाशक वापरावे लागत नाही. म्हणजे लागन आणि दोन खोड़वे असे तिन चार वर्षात एकदाच तणनाशक मी वापरतो
2. तण उगवणीपूर्वी वापरावयाचे
मेत्रीबुझीन (सेंकोर ) ओल असतानाच फवारावे हे मुळाद्वारे व काही प्रमाणात पानाद्वारे शोषले जातात.मेत्रीबुझीन हे २.२ किलो प्रती हेक्टर च्या वर फवारू नये .हि फवारणी झाली असता ९-१० दिवसांनी पाणी दिल्यास चांगला परिणाम मिळतो .24D हे फवारले असता शेजारील ४-५ एकरात कपाशी वर वाईट परिणाम दिसतो .
ऊस लागण झाल्यानंतर 3 ते 4 दिवसात जमिनीत ओल असताना मेट्रीब्युझिन 41% तण नाशक व्यवस्थित फवारावे. योग्य फ़वारणि झाल्यास सुमारे 2 महीने तण उगवत नाही. फक्त द्विदल तण उगवत नाही. ऊस उगवणिवर वाईट परिणाम होत नाही.
काही वेळा तण रानात उगवलेले असताना लागण करावी लागते. अशा वेळी मेट्रीब्युझिन 41% बरोबर 24D मिसळुन फवारणी केल्यास उगवलेले तण मरेल व दोन महीने नविन तण उगवणार नाही. ऊस उगवणिवर वाईट परिणाम होत नाही.
काही शेतकरी लागन झाले नंतर 15 दिवसानी जमिनीत ओल असताना मेट्रीब्युझिन 41% आणि 2 4D फवारतात, त्या मुळे तिथून पुढे 2 महीने तण उगवत नाही. म्हणजे अडीच महीने तण मुक्त रान असेल.
No comments:
Post a Comment