Monday, 7 September 2015

ऊस लागवड फवारणी व्यवस्थापण

उस पीकाला हवा,पाणी,सूर्यप्रकाश ,तापमान, खते इ.सर्व घटक अनुकूल अशा मिळाल्या तर शरीरात जैव रसायने तैयार होतात.त्यातलाच एक प्रकार म्हणजे संजिवाके .
वैशिष्टे
*अत्यंत सूक्ष्म प्रमाणात तयार होतात.
*पान,मुळे,खोड यांच्या कोवळ्या अंकुरात होतात.तेथून जीते कार्य असते तिथे वाहून नेली जातात.
*बीजाचा रुजावा,कोम्ब येणे, पालवी फुटणे, मुळे सुटणे, कांड्याची संख्या, लांबी,जाडी , साखर प्रमाण इ. बाबी संजिवकान्च्या विशिष्ट सन्तुलनामुळे घडते.
*संजिवाकाचे संतुलन चांगले असेलतर जमिनीत दिलेल्या खताचे, पाण्याचे शोषण होते, गाळ्पा योग्य उसाची संख्या वाढते.
*फ़ोटोसिन्थेसिस होऊन टनेज वाढते.
*** कांही महत्वाचे***
*संजिवके म्हणजे NPK सारखे पोषण द्रव्ये नव्हे.
* संजिवके म्हणजे सूक्ष्म द्रव्ये नव्हे.
* संजिवके म्हणजे कीटक नाशक किंवा जंतु नाशक नव्हे.
* संजिवके म्हणजे जीवाणु किंवा सेंद्रिय ख़त नव्हे.
#ऊसामध्ये खालिल संजिवके वापरता येतात.#
1.ऑक्झिन्स उदा IBA NAA
2.जिबरेलिन उदा GA4 GA7 GA3
3.सायटोकायनिन उदा 6BA
4.ट्रायकन्टेनाल
5.पोलारिस
6.ग्लायाफोसेट
अलीकडे सागर वनस्पतीचे अर्क उपलब्ध झालेले आहेत.आस्कोफायलम नोडुसम या वनस्पति पासून तैयार करतात.त्यामध्ये संजिवाके आणि पोषण द्रव्ये भरपूर प्रमाणात असतात.
उसाचे पेराची लांबी, जाडी आणि संख्या वाढवण्याचे काम संजिवकाचे फवारणिने शक्य होते.

1) पहिली फवारणी
लागणी पासून 45 दिवसानी व खोडव्यासाठी तुट्ल्या पासून 30 दिवसानी आणि नंतर प्रत्येक 20 दिवसाचे अंतराने .
# पोषण द्रव्ये #
*18:18:18/19:19:19 - 600 ग्राम
* चिलेटेड सुक्ष्म अन्न द्रव्ये - 150 मिली
8 लीटर पाण्यात मिसळावे .
# संजिवाके #
* IBA किंवा NAA - 2 ग्राम
* SIX BA - 2 ग्राम
सालव्हन्ट मध्ये विरघळुन घावे आणि वरील 8 लीटर पाण्यात मिसळावे.
# पीक संरक्षके #
* क्लोरोपायारिफोस - 120 मिली
* बाविस्टिन - 120 ग्राम
वरील 8 लीटर पाण्यात मिसळावे.
15 लिटरच्या पम्पात, वरील तयार केलेल्या मिश्रणा पैकी 2 लिटर मिश्रण पम्पात घ्यावे, पम्प पाण्याने भरुन फवारणी घ्यावी.
एकरी 4 पम्प पुरातात.
या फवारणित संजिवके आणि पोषण द्रव्ये सोबत बुरशी नाशक आणि कीटक नाशक आहे. याच दरम्यान खोड किड येत असते, काही बुरशी त्रास देत असतात, याचा विचार करुन ही फवारणी ठरवली आहे.

2) दूसरी फवारणी
लागणी पासून 65 दिवसानी व खोडव्यासाठी 50 दिवसानी
# पोषण द्रव्ये #
*13:40:13/12:61:0/17:44:0- 900 ग्राम
* चिलेटेड सुक्ष्म अन्न द्रव्ये - 200 मिली
12 लीटर पाण्यात मिसळावे .
# संजिवाके #
* IBA किंवा GA - 3 ग्राम
* SIX BA - 3 ग्राम
अल्कोहोल व सालव्हन्ट मध्ये विरघळुन घ्यावे आणि वरील 12 लीटर पाण्यात मिसळावे.
# पीक संरक्षके #
* क्लोरोपायारिफोस - 180 मिली
* बाविस्टिन - 180 ग्राम
वरील 12 लीटर पाण्यात मिसळावे.
15 लिटरच्या पम्पात, वरील तयार केलेल्या मिश्रणा पैकी 2 लिटर मिश्रण घ्यावे व पाणी भरुन फवारणी घ्यावी.
एकरी 6 पम्प पुरातात.
या फवारणित संजिवके आणि पोषण द्रव्ये सोबत बुरशी नाशक आणि कीटक नाशक आहे. याच दरम्यान खोड किड येत असते, काही बुरशी त्रास देत असतात, याचा विचार करुन ही फवारणी ठरवली आहे.

3) तीसरी फवारणी
लागणी पासून 85 दिवसानी व खोडव्यासाठी 70 दिवसानी
# पोषण द्रव्ये #
*13:40:13/12:61:0/17:44: 0 - 1500 ग्राम
* चिलेटेड सुक्ष्म अन्न द्रव्ये - 300 मिली
20 लीटर पाण्यात मिसळावे .
# संजिवाके #
* GA - 6 ग्राम
* SIX BA - 6 ग्राम
अल्कोहोल व सालव्हन्ट मध्ये विरघळुन घावे आणि
वरील 20 लीटर पाण्यात मिसळावे
# पीक संरक्षके #
* मोनोक्रोटोपास (आवश्यकतेनुसार) - 300 मिली
* हेक्झकोनेझाल (आवश्यकतेनुसार) - 300 ग्राम
वरील 20 लीटर पाण्यात मिसळावे.
15 लिटरच्या पम्पात, वरील तयार केलेल्या मिश्रणा पैकी 2 लिटर मिश्रण घ्यावे व पाणी भरुन फवारणी घ्यावी.
एकरी 10 पम्प पुरातात.
या फवारणित संजिवके आणि पोषण द्रव्ये सोबत बुरशी नाशक आणि कीटक नाशक आहे.

4) चौथी फवारणी
लागणी पासून 105 दिवसानी व खोडव्यासाठी 90 दिवसानी
ही फवारणी महत्वाची आहे, या नंतरची फवारणी ऊसाच्या ऊंची मुळे देता येणेची शक्यता कमी असते.
# पोषण द्रव्ये #
*13:40:13/12:61:0/17:44: 0 - 1500 ग्राम
* पोट्याशियम माग्नेशियम सल्फेट - 500 ग्राम
* काल्शियम नायट्रेट - 500 ग्राम
20 लीटर पाण्यात मिसळावे .
# संजिवाके #
* GA - 7 ग्राम
* SIX BA - 7 ग्राम
अल्कोहोल व सालव्हन्ट मध्ये विरघळुन घावे आणि
वरील 20 लीटर पाण्यात मिसळावे.
* ट्रायकाँन्टेनाँल - 500 मिली
* सी विड एक्स्ट्राक्ट - 500 मिली
वरील 20 लीटर पाण्यात मिसळावे.
15 लिटरच्या पम्पात, वरील तयार केलेल्या मिश्रणा पैकी 2 लिटर मिश्रण घ्यावे व पाणी भरुन फवारणी घ्यावी.
एकरी 10 पम्प पुरातात.

5) पाचवी फवारणी (शक्य झालेस)
लागणी पासून 125 दिवसानी व खोडव्यासाठी 105 दी
# पोषण द्रव्ये #
*12:61:0 - 1800 ग्राम
* पोट्याशियम माग्नेशियम सल्फेट - 600 ग्राम
26 लीटर पाण्यात मिसळावे .
# संजिवाके #
* GA - 10 ग्राम
* SIX BA - 10 ग्राम
अल्कोहोल व सालव्हन्ट मध्ये विरघळुन घावे आणि
वरील 26 लीटर पाण्यात मिसळावे.
* ट्रायकाँन्टेनाँल (0.1%) - 1000 मिली
* सी विड एक्स्ट्राक्ट - 500 मिली
वरील 26 लीटर पाण्यात मिसळावे.
15 लिटरच्या पम्पात, वरील तयार केलेल्या मिश्रणा पैकी 2 लिटर मिश्रण घ्यावे व उरलेले पाणी भरुन फवारणी घ्यावी.
एकरी 13 पम्प पुरातात.

वरील प्रमाणे आणि शास्त्र समजुन जर प्रयत्न केले तर एकरी 100 टनच काय तर माझ्या इकडे "एकरी 151" टनाचा प्रयोगही निश्चित पणे यशस्वी होणार यात शंकाच नाही

No comments:

Post a Comment