उन्हाळी नांगरट होऊन ढेकळे न फोड़ता जमीन में महिन्याच्या पहिल्या पंधरवडया पर्यन्त चांगली तापलेली असावी, वैशाख जेष्ठाची प्रखर उन्हें जमिनीत आरपार भेदुन गेलेली असावीत. त्यामुळे पूर्वी घातलेल्या खतापैकी जमिनीत बंदिस्त झालेली अन्नद्रव्ये मुक्त झालेली असावीत. में महिन्यात कधीतरी बरसनारयां वळ्वाने, तापलेल्या जमिनितिला आक्टीनो मायासेट चेतविले जावेत. पावसाच्या शिड्काव्याने सुक्ष्म जीवांनी उत्सर्जित केलेल्या द्रवाने आसमंत सुगन्धित व्हावा.
आशा या तापलेल्या जमिनीवर कम्पोस्ट, शेणखत, लेंडीखत, गाण्डुळ ख़त, कोम्बडि ख़त, पेंडी ख़त असे मिसळुन एकरी चार पाच टन सेंद्रिय पसरलेले असावे. रोटरने ते एकजीव झाल्यावर में महिन्याच्या अखेरीस ताग धैच्या पेरालेला असावा. जुलैच्या पहिल्या आठवड्यात तो फुलावर यतो.जमिनीत गाडून त्यावर एकरी एक पोते यूरिया व् एक पोते सिंगल सुपर फोस्फेट ट़ाकुन हिरवलिच्या खताशी एकरूप करावा.
अशी तापलेली, बेवड झालेली, सेंद्रिय घटकांनि समृद्ध झालेली जमिन म्हणजे उच्चांकी उत्पादनाचे ध्येय गाठन्याची पहिली पायरी आहे.
जमीन सुपिक असल्या शिवाय कोणतेही पिक उत्तम येणार नाही. योग्य मशागत, योग्य प्रमाणात सेंद्रिय खते आणि जिवाणू यांचा योग्य वापर या मुळे जमीन सुपिक होते. सेंद्रिय ख़त म्हणजे शेणखत, कम्पोस्ट ख़त, गाण्डुळ ख़त, लेंडी ख़त, अखाध्य पेंड़ी , हिरवळिचे खत वगैरे होय. यांच्या वापरामुळे जमिनीची जडण घडण सुधारते, कणाची रचना सुधारते, ह्यूमसचे प्रमाण वाढून अन्न द्रव्ये व् उपयुक्त पाण्याची धारण शक्ति वाढते. सामू योग्य होतो, क्षारता सुधारते आणि अत्यंत महत्वाचे म्हणजे 'सेंद्रिय कर्ब' वाढतो. सेंद्रिय कर्ब हे जिवाणुचे खाद्य आहे. त्याच्या मुळे जिवाणुनची संख्या आणि कार्यक्षमता योग्य रहाते. जमिनीत पुरवलेले अन्न घटक / खते पिकाला उपलब्ध करून देण्याचे कार्य जमिनीतील विविध जीवाणु करीत असतात. जीवाणु योग्य प्रमाणात आणि कार्यक्षम असले की दिलेली खते पिकास भरपूर उपलब्ध होतात , त्यामुळे उत्पादनात भरीव वाढ होते. अशा अनेक बाबी सेंद्रिय खतामुळे सुधारतात आणि जमीन सुपिक रहाते.
जमिनीतील सेंद्रिय कर्ब हा अनेक प्रकारच्या स्वरूपात दिसून येतो.जमिनीत सूक्ष जीवाणु त्यांचे विघटन करीत असतात.या विघट्नातुन जे नवीन सेंद्रिय पदार्थ तयार होतात ते बऱ्याच प्रमाणात स्थिर स्वरुपाचे असतात.वैद्न्यानिक अर्थाने आपण त्यांना ह्युमस असे नाव् देतो.हयुमसयुक्त सेंद्रिय पदार्थ चार घट्कांमध्ये विखुरलेला असतो. त्याला ह्युमिक आसिड,फुलविक आसीड,ह्युमिन व् हेमाटोमेलानिन या नावाने संबोधले जाते.यांचे प्रमाण वेगावेगले असते त्यामुले जमिनीच्या गुणधर्मावर व अन्न्द्रव्य शोषणावर वेगावेगले परिणाम दिसून येतात.
ह्युमसमुळे भौतीक रासायनिक व जैविक
गुणधर्मात क्रांतिकारी बदल होतात.या बदलामुले जमिनिनिची सुपिकता पातली तर वाढ़तेच पण त्या बरोबरच तिची उत्पादन क्षमताही वाढते.
महाराष्ट्रातिल हवामान तसे उष्ण असलेणे जमिनीतील सेंद्रिय कर्बाची पातळी सतत कमी होंत असते आणि ती 0.6 च्या आसपास स्थिरवते.ही पातळी 0.8 च्या वर असावी. पण तसे पातळी गाठणे खुप जिकिरिचे असते.
सेंद्रिय कर्बाची पातळी योग्य ठेवाणेसाठी सेंद्रिय खते मुबलक पुरवावित.
शेणखत,कम्पोष्ट ख़त, गान्डुल ख़त, अखाध्य पेंडीचे मिश्रण, लेंडी ख़त, पोल्ट्री ख़त इत्यादि आणि या शिवाय अति महत्वाचे म्हणजे हिरवळिचे ख़त होय. आणखिणहि आपापल्या परिसरात उपलब्ध असणारे सेंद्रिय खते जमिनिस योग्य प्रमाणात पुरवावित.
महत्वाचे- सेंद्रिय कर्बामुळे जिवनुंचि संख्या आणि कार्यक्षमता सुधारते आणि अन्न घटकाचे उपलब्धिकरन मोठ्या प्रमाणात होते.
खोडव्यास नांगरट, कलटिव्हेटर, रोटर, सरी वगैरे मशागतिचि आवश्यकता नसते म्हणजेच तो खर्च नसतो. बियाणे , लागनीचा खर्च वगैरे बाबींचा खर्च नसतो. हे अत्यंत महत्वाचे आहे. याच्या शिवाय अजुन अत्यंत महत्वाचे आणि उत्पादन जास्त मिळण्याची बाब म्हणजे; उस ज्या क्षणी तुटतो त्या क्षणपासून खोडव्याची वाढ सुरु झालेली असते. लागण केले नंतर 15 ते 25 दिवस उसाची उगवण होण्यास लागतात आणि नंतर हळू हळू जश्या मुळ्या तयार होतील तशी त्याची सुरुवातीला हळू हळू वाढ होते आणि नंतर जोमाने वाढ होते. खोडव्या मध्ये मात्र वाढ लगेच होते कारण त्याच्या मुळ्या आगोदरच तयार असतात. त्याला योग्य खत पाणी मिळाले की जोमाने वाढ सुरु होते.
ऊस तुटल्या नंतर पाचट न जाळता सरी मध्ये दाबून घ्यावे किंवा पाचट जास्त असल्यास कुट्टी मशीनने टुकड़े करुन सरित दाबून घ्यावे. पाचट व्यवस्थित कम्पोस्ट होण्यासाठी त्याचेवर 50 किलो यूरिया 100 किलो सिंगल सुपर फॉस्फेट पसरावे. शक्य झालेस 4 ते 5 किलो कम्पोष्ट जीवाणु पसरावेत.
No comments:
Post a Comment