Monday, 7 September 2015

ऊस लागवड रासा खाताच्या योग्य मात्रा

एक टन ऊस पिकवण्यासाठी NPK किती लागतो याची माहिती अनेक शास्त्रज्ञांनी सिद्ध केले आहे. त्यानुसार अपेक्षित उत्पादन मिळवणेसाठि एकूण किती NPK लागेल त्या पैकी जमिनीत शिल्लक असलेला वजा जाता वरून किती द्यावा या साठी विद्यापिठाने 'अपेक्षित ऊस उत्पादनाचे सूत्र' दिले आहे, त्यानुसार खताच्या मात्रा ठरवाव्यात आणि 6 ते 7 वेळा विभागून योग्य मात्रेत योग्य वेळी आणि योग्य ठिकाणी द्याव्यात.

सुक्ष्म अन्न द्रव्ये देणे

सुक्ष्म अन्न द्रव्ये व् मँग सल्फेट ही दोन्ही खते NPK बरोबर न देता थोड्या शेणखतात 5 ते 7 दिवस मुरवत ठेवावेत आणि नंतर द्यावेत. बेसल डोस देण्या आगोदर 5 ते 7 दिवस मिसळुन ठेवावे, आणि लागनिचे वेळी द्यावे.
या मुळे सुक्ष्म अन्न द्रव्यान्ना सेंद्रिय चे कोटिंग होते ,त्या मुळे NPK बरोबर त्याचे प्रेसीपिटेशन होत नाही. दिलेल्या खाताची उपयुक्तता पूर्ण पणे मिळते.
किंवा बाजारात चिलेटेड सुक्ष्म अन्न द्रव्ये मिळ्तात ती वापरावीत. ती थोडी महाग आहेत.
मोठी बांधनी किंवा भरणी चे वेळी देखिल असेच करावे.

एकरी मात्रा 100 टन ऊस उत्पादन
लागणिस मी देत असलेली मात्रा
1) सेंद्रिय ख़त 200 ते 500 किलो
डीएपी 100 किलो,
एमओंप़ी 100की,
सु अ द्रव्य 10किलो,
गंधक ग्रान्युअल 15 की,
माग सल्फेट 25 किलो.
सरीत टाकून मातीत मिसळुन घ्यावे.
2) 20 व्या दिवशी
यूरिया 50किलो सरित द्यावा.
3) 40 व्या दिवशी
यूरिया 100 किलो ,
लिम्बोळि पेंड 10किलो( जास्त नको)
मिसळुन सरित ध्यावे
4) 65 व्या दिवशी (बाळ भरणी)
यूरिया 50 किलो,
डीएपी 50 किलो,
एमओंप़ी 50 की
पहारिने छिद्रे घेऊन द्यावे.
6) भरणीचे वेळी
सेंद्रिय ख़त 200 ते 500 किलो ,
यूरिया 150 किलो,
डीएपी 100 किलो,
एमओंप़ी 75 की,
सु अ द्रव्य 10 किलो,
गंधक ग्रान्युअल 15 की,
माग सल्फेट 25 किलो.
7)मृग़ नक्षत्र निघाले नंतर द्यावे
24.24.0 100किलो
पोट्याश 25 किलो

No comments:

Post a Comment