खालील बाबी महत्वाच्या आहेत, लक्षात ठेवा.
नैसर्गिक रित्या प्रति एकारामध्ये पक्व ऊसाचि संख्या 35000 ते 45000 असते. "सरासरी 40000 असते" ! इथून पुढे हे सतत लक्षात ठेवले पाहिजे, " एकरी पक्व ऊसाचि संख्या 40000 असते" !
सुरुवातीला म्हणजे लागण झाले नंतर येणार्या फुटव्यांची संख्या अति जास्त असते. जास्त म्हणजे किमान दिड दोन लाखा पेक्षा जास्त ! आणि एवढे जास्त असलेली फुटव्यां पैकी शेवटी उरतात फक्त 40000 पक्व ऊस !! बाकीचे फ़ुटवे बरेच दिवस जगतात, जमिनीत टाकलेले अन्न ( खते ) खात असतात आणि 4 / 5 महिन्यानंतर ह्ळु ह्ळु 'गर्दी' मुळे मरुन जातात. ते आपोआप मरत असतात , त्या साठी आपल्याला काही करायचे नसते.
इथे एक महत्वाची गोष्ट लक्षात घ्या - शेवट पर्यन्त नैसर्गिक रित्या जगणारे पक्व ऊस ( 40000 ) आणि गर्दी होऊन मराणारे ( एक ते दोन लाख ) हे दोन्ही फ़ुटवे जमिनीतील अन्न समान खात असतात आणि समान वाढत असतात. 4/5 महिन्यानी त्यातील कमकुवत असणारे फुटवे हळु ह्ळु गर्दी मुळे मरायला लागतात. हे जे मरणारे फ़ुटवे आहेत ते जेवढे दिवस जगतात तेवढे दिवस जमिनीतील अन्न खात असतात. आणि 4/5 महिन्यानी गर्दिमुळे हळु ह्ळु मरुन जातात. यात काळजी करण्यासारखे म्हणजे असे अन्न खाऊन मरणार्यान्ची संख्या 'शेवट पर्यन्त जगणार्या फ़ुट्व्यापेक्षा' (पक्व ऊस) खुपच जास्त असते. जवळ पास 3 ते 5 पट जास्त! त्या मुले जमिनीत आपण टाकलेल्या खता पैकी खुप जास्त खत (3 ते 5 पट) मरणारे फुटवे खातात , आणि मध्येच मरुन जातात. त्या मुळे जगणार्याना खुप कमी खत खायला मिळते. याचा परिणाम त्यांची जाडी, उंची चांगली येत नाही, ऊस चांगल्या प्रकारे वाढत नाही ऊस बारीक रहातो आणि शेवटी उत्पादन कमी मिलते.
लक्षात घ्या, ऊस हे खादाड पिक आहे. त्याला सुरुवाती पासून आणि पुढेही वेळच्या वेळी संतुलित ख़त खायला मिळावे लागते. आणि यासाठी त्यांना स्पर्धा करणारे फ़ुट्व्यान्ची संख्या मर्यादित असावी लागते. योग्य असावी लागते.
आपल्या लक्षात आले असेल की; पक्व उसाला स्पर्धा करणारे फुटवे जास्त नकोत. आणि असे फुटवे जेवढे जास्त तेवढा पक्व ऊस किंवा शेवट पर्यन्त जगणारे ऊस,स्पर्धा करणार्या फ़ुट्व्यान्नि खत जास्त खाल्या मुळे बारीक रहातात, आणि त्यामुळे अपेक्षित आव्हरेज/ टनेज मिळत नाही. आम्हा खुप शेतकरयाना असे वाटते की, "ऊसाचे फ़ुटवे जेवढे जास्त तेवढा ऊस फार चांगला आला" असे आपण म्हणतो. एवढेच नव्हे तर आपण एकमेकाला सांगतो की; ऊसाला जेवढे फुटवे जास्त तेवढा ऊस चांगला.
पण असे नाही, फुटवे योग्य प्रमाणात असायला हवेत. कमी नव्हेत!! "योग्य" पाहिजेत. योग्य म्हणजे किती हे समजले पाहिजे.
आपण पाहिले आहे की आहे की, "नैसर्गिक रित्या एक एकरात सरासरी 40000 ऊस जगतात". आणि फुटवे 60000 ते 70000 असावेत. म्हणजे त्यातील 20000 30000 फुटवे वेगवेगळ्या कारणानि मरतात. म्हणजे काही खोड कीड़ी मुळे मरतात, तर काही बाळ भरणी आणि मोठी भरणीच्या वेळी मारतात. अशा मराणार्यांची सख्या कमी असावी. म्हणजे खत फार वाया जाणार नाही.
एकंदरीत सुरुवातीला 60000 ते 70000 फुटवे घ्यावेत आणि त्यातील 40000 ते 45000 फुटवे जगुन ते पक्व ऊस होतील.
दोन महिन्याचे दरम्यान फुटव्यांची संख्या योग्य आले नंतर ऊसाचि "बाळ बांधणी" करावी. म्हणजे पुढे जादा फुटवे येणार नाहित आणि उत्पादनावर जादा फ़ुट्व्यान्मुळे वाईट परिणाम होणार नाही.
ऊसाचि "बाळ बांधणी" करणे हे अत्यंत महत्वाचे आहे.
बहुतेक आपण ऊसाचि "बाळ बांधणी" करत नाही. दुर्लक्ष करतो.
आता याच प्रमाणे गणित करावे.
सरिची रुंदी x सरिची लांबी = तेवढे जगणारे ऊस
सरिची रुंदी x सरिची लांबी = त्याचे सव्वा दीड पट फुटवे
*5 फ़ुट x 10 फ़ुट = 50 चौ फ़ुट, जगणारे 50 ऊस आणि फुटवे 60 ते 75
*6 फ़ुट x 10 फ़ुट = 60 चौ फ़ुट , जगणारे 60 ऊस आणि फुटवे 70 ते 90 फुटवे
*7 फ़ुट x 10 फ़ुट = 70 चौ फ़ुट, जगणारे 70 ऊस आणि 90 ते 110 फ़ुटवे
*4.5 फ़ुट x 10 फ़ुट = 45 चौ फ़ुट, जगणारे 45 ऊस आणि 60 ते 70 फुटवे
*4 फ़ुट x 10 फुटी = 40 चौ फ़ुट, जगणारे 40 ऊस व 55 ते 60 फुटवे
* 3.5 फ़ुट x 10 फ़ुट = 35 चौ फ़ुट, जगणारे 35 ऊस व 50 फुटवे
* 3 फ़ुट x 10 फ़ुट = 30 चौ फ़ुट, जगणारे 30 आणि फुटवे 45 असावेत